भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर
 
 
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुहासचंद्र कुलकर्णी
स्वर - अनुराधा पौडवाल
चित्रपट - तुझ्यावाचून करमेना (१९८६)
For the printable version of this song, click here.