तू नसतिस तर, तू नसतिस तर

तू नसतिस तर गेले असते
रोप चिमुकले सुकून-वाकुन
तू नसतिस तर केले असते
कुणी तयावर अमृतसिंचन ?

तू नसतिस तर मिळता कोठुन
घरट्याचा हा रम्य निवारा
तू नसतिस तर मिळता कोठुन
पंखाखाली गोड उबारा ?

तू नसतिस तर कळली नसती
कळ्या-फुलांची कोमल बोली
तू नसतिस तर मिळली नसती
मृदु शीतलता चांदण्यातली !

तू नसतिस तर कळले नसते
जीवन म्हणजे अथांग प्रीती
तू नसतिस तर जुळल्या नसत्या
गीताच्या या मंजुळ पंक्ती !
 
 
गीत - शांताराम आठवले
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - वहिनीच्या बांगड्या (१९५३)
राग - केदार (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.