संपली कहाणी माझी संपली कहाणी !

धुंद चांदण्या त्या राती संगतीस होती प्रीती
स्वप्नभारल्या जीवाला आस मीलनाची होती
आस लोपली ती आता म्लान रातराणी !

मुके पाखरू ये कोणी स्नेहशून्य माझ्या गेही
लळा लावुनी का ऐसा उडुन आज जावे तेही ?
बाहुलीविना त्या दृष्टी अंध दीनवाणी !

अर्थहीन जीवन झाले प्रेमबंध तुटता सारे
दिशांतून घेरित आले क्रूर वादळाचे वारे
विनाकिनाऱ्याची राहे रात ही दिवाणी !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - हा माझा मार्ग एकला (१९६३)
For the printable version of this song, click here.
   
  Raja Paranjape, Sudhir Phadke, Ga Di Madgulkar
  Raja Paranjape,
Sudhir Phadke,
Ga Di Madgulkar