उगी उगी गे उगी
आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी

ढगावरून ती चाले गाडी
शुभ्र पांढरी जरा वाकडी
ससा सावळा धावत ओढी
असली अद्भुत गाडी कुठली रडणा-यांच्या कुढ्या जगी

चांदोबाच्या बघ माथ्यावर
निळसर काळी छत्री सुंदर
नक्षत्रांची तिजसी झालर
हसणा-यांच्या घरी पिकवतो सर्व सुखाची चंद्र्सुगी

उगी पहा तो खिडकियात
चांदोबाचा आला हात
हात आईचा जणु दुधात
घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - आंधळा मागतो एक डोळा (१९५६)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.