स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का, लाजून राहिले मी

एकांत हा क्षणाचा, भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात, जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी

घेशील का सख्या, तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला, साक्षी वसंत राजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - आम्ही जातो अमुच्या गावा (१९७२)
राग - मधुवंती (नादवेध)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.