असा नेसून शालू हिरवा, आणि वेणीत खुपसून मरवा
जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे ?

का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाज-या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे, तुला सांगते
त्याची माझी रे प्रीत जडे

तुज परी गोरी गोरी, चाफ्यावानी सुकुमारी
दुपारच्या पारी ऊन जळते, ग वर ऊन जळते

टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठठेव, तिला कळते रे तिची तिला कळते

का ग आला असा फणकार, कणाकणाचा करीत झणकार
जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे ?

दूर डोंगरी घुमते बासरी, चैत्र बहरला वनामधी
पदर फडफडतो, ऊर धडधडतो, प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घरातील युवती, लोक फिरतात अवती भवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते
वळून बघते मी मागे पुढे
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - लता मंगेशकर, सुधीर फडके
चित्रपट - किचकवध (१९५९)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.