क्षणात कळली, क्षणात जुळली
भूल कशी पडली
तुझी माझी प्रीत जगावेगळी

शतजन्माची नाती अपुली
बघता बघता अवचित जडली
किमया ही कसली

प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमाला या बंध कुणाचे
गाठ तिथे फसली

नाही ठावूक कुठे जायचे
तुझ्या मागून मला यायचे
वाट आता ठरली
 
 
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - शंकरराव कुलकर्णी
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - पहिले प्रेम (१९५७)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.