डोळ्यापुढे दिसे जे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचीव

ही, एक आस होती हृदयात एकमेव
डोळ्यापुढे दिसे रे मज चित्र ते सजीव

कोलाहली जगाच्या घरकुल आपुले हे
‘सोलीव’ शांततेचे मंदिर सानुले गे
मी येथली पुजारी, तू पूजनीय देव

गीतासवे तुझ्या, गेही प्रभात व्हावी
खाद्या रुचि सुधेची, हाते तुझ्याच यावी
वाहीन देह देवा, वाहीन जीवभाव

दिन सोनियात न्हावा, रजतात रातराणी
आनंद तोच यावा, लेवून बाललेणी
‘साकार’ ये सामोरी, स्वप्नात हीच शीव
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - भिंतीला कान असतात (१९६२)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.