तू नजरेने ‘हो’ म्हटले, पण वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यांत तुझे, पण वरमाला पडणार कधी ?

तुझे हासरे नयन आठवित, दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम ग, होणार कधी ?

तू नसताना तुझी आठवण, मना जाळिते पदोपदी
एक विचारू तुला ?
काय ?
होणार कधी ग सप्तपदी ?
 
 
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - झाले गेले विसरून जा (१९५७)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.