चंदनाच्या देव्हा-यात उभा पांडुरंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग

झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म
नका करू कुणी माझ्या समाधिचा भंग

मातीचे ग सोने झाले सोनियाची माती
तोडिले मी धागे धागे जोडियली नाती
हात पाय असुनी मी जाहलो अपंग
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - देवघर (१९८१)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.