सहस्त्ररुपे तुम्ही सदाशीव, श्रवणाशी बैसला
सांगतो परीसा शिवलिला

प्रसन्न हो मज हे वाग्देवी
व्यास महर्षे कृपा असावी
सुरस कथा ही सजीव व्हावी
श्रवणीचे सुख साध्य असावे, मना लोचनाला
सांगतो परीसा शिवलिला

स्थळ काळासह व्यक्ती-व्यक्ती
करीत नर्तन नयना पुढती
कथेने उपजो मनात भक्ती
रवी प्रभेसम विस्तारावा, आशय शब्दातला
सांगतो परीसा शिवलिला
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - यशवंत देव
स्वर - सुधीर फडके
नृत्यनाटिका ’शिवपार्वती’ (१९६८)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.