समचरण सुंदर
कासे ल्याला
पीतांबर
अनादी या माळा
रुळती
मुख्य त्यात
वैजयंती
उरी वत्सांचे
लांछन
ऐसा उभा नारायण
हाती धरितो
आयुधे
शंख चक्र पद्म
गदा
मुखमंडळाची
शोभा
कोटि सूर्या
ऐशी प्र्भा
काय मागावे
आणिक
उभे ठाके मोक्ष
सूख
धन्य झाली माझी
भक्ति
बोळंगिल्या
चारी मुक्ती
पसरोनि दोन्ही
बाहु
आलिंगिला पंढरी
राऊ |