देवाघरच्या फुला सोनुल्या, देवाघरच्या फुला

आपुले मंगल सांगत नाते बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो, झुलवित वारा झुला

दुडुदुडु धावत हसत चिमुकला, असे जिवाचा माझा छकुला
अवती भवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला

मातापित्यांनी तुला सोडिले हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - सोबती (१९७९)
For the printable version of this song, click here.