का ग अशा थांबला आपसात पांगला
दिवस आज चांगला, भांगला, भांगला

रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या
बिलवरासी बांगड्यांना किण्ण किण्ण बोलू द्या

घरात सवत नाही ना खपत, तसंच गवत रानामंदी
धरून मुठीत, मुळात छाटीत, फेकत ऐटीत उन्हामंदी
रानातला रोग सारा बारा वाटा जाऊ द्या

शंभर खुरपी सरळ तिरपी चालवा सारखी जोसामंदी
वेग तो वाढवा आवाज चढवा भरा ग गोडवा उसामंदी
काजळाच्या खाणीवाणी वाफा वाफा होऊ द्या
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - ललिता फडके, सुधीर फडके
चित्रपट - चिमण्यांची शाळा (१९६२)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.