तोच चंद्रमा
नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप
तीच तूहि कामिनी
!
नीरवता ती तशीच
धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले
चित्र तेच देखणे
जाईचा कुंज
तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते
तसेच धुंदि
आज ती कुठे
?
मीहि तोच तीच
तूहि प्रीति
आज ती कुठे
?
ती न आर्तता
उरात स्वप्न
ते न लोचनी
त्या पहिल्या
प्रीतीच्या
आज लोपल्या
खुणा
वाळल्या फुलांत
व्यर्थ गंध
शोधतो पुन्हा
गीत ये न ते
जुळून भंगल्या
सुरांतुनी
|