चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची
लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची
दे साथ जीवनाची !

बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची
आले नवी वधू मी ही रात मीलनाची
ही रात मीलनाची !

हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा
उबदार गारव्याचा अंगावरी शहारा
आली जणु कळी ही उमलून यौवनाची
दे साथ जीवनाची !

माझ्या पुढे उभी तू लेऊन रूप साज
का हासते कळेना डोळ्यामधील लाज
समजूत काढ्वेना या बाव-या मनाची
ही रात मीलनाची !

हाती तुझ्याच हात, हा स्पर्श अमृताचा
घुमतो मनात सूर संसार संगीताचा
गाऊ मिळून नांदी भावी सुखी क्षणांची
दे साथ जीवनाची !
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - बाळ पळसुले
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - सुधारलेल्या बायका (१९६५)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.