एकतारिसंगे एकरूप झालो
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

गळा माळ शोभे आत्मरूप शांती
भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो

भूक भाकरीची, छाया झोपडीची
निवा-यास घ्यावी उब गोधडीची
माया-मोह सारे उगाळून प्यालो

पूर्व पुण्य ज्याचे, मिळे सुख त्याला
कुणी राव होई, कुणी रंक झाला
मागणे न काही सांगण्यास आलो
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - बाजिरावाचा बेटा (१९७१)
राग - यमनकल्याण (नादवेध)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.