गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी झूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे
चित्रपट - एक होता विदूषक (१९९२)
For the printable version of this song, click here.