भर तारुण्याचा मळा कमळिणी कळा फुलांचा भार
डोळ्यातून हलका पाऊस भिजला मोरनी झालंय भार

बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान

अलवार फुलांची होरी राजस गोरी गहिनागौर
ह्या कळ्या फुलांच्या देठामधले रंग सये गर्भार

देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी
हा बहर कहर अंगात विकावी रात पाखरासाठी

पौषात हिवाळी रात गळ्यामंदी हात गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या विभवावरी जाणते रावे

भर तारुण्याचा मळा कमळिणी कळा गगन घनदाट
डोळ्यात लालसर गडद गर्दशी स्पर्श जांभळी रात
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट - एक होता विदूषक (१९९२)
For the printable version of this song, click here.