लाल पैटणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला

उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला

अशी नार झुबेदार, हिचा कोण भरतार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट्‍अ नेसून हिंडते नऊवार

गो-या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला

शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते

रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाही कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार

माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - आनंद मोडक
स्वर - आशा भोसले, चंद्रकांत काळे
चित्रपट - एक होता विदूषक (१९९२)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.