बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग

थरथरावा कधी रे वादळचा वेल
भक्तीभाव वा-यावरी मधूर झुलेल
तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग

दीपराग गाउनिया सदा चंद्र-सूर्य
सृष्टी मफिलीत खुलवी सुरम्य सौंदर्य
झळकती नादांतरी निखळ सप्तरंग

निशीदिनी नित्यनेमे चाले संकीर्तन
किरणांच्या आरतीने सतेज वंदन
मांगल्यात ऋतुऋतूंचे मोहरले अंग
 
 
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - मुकुंद गद्रे
स्वर - पं. भीमसेन जोशी
राग - भीमपलास, नटभैरव व इतर
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.