चक्रवाक पक्षी
वियोगें बहाती
।
झालें मजप्रति
तैसें आतां
॥१॥
चुकलीया माय
बालकें रडती
।
झालें मजप्रति
तैसें आतां
॥२॥
वत्स न देखतां
गाई हंबरती
॥
झालें मजप्रती
तैसें आतां
॥३॥
जीवनावेगळे
मत्स्य तळमळती
।
झालें मजप्रति
तैसें आतां
॥४॥
नामा म्हणे
मज ऐसें वाटे
चित्तीं ।
करितसे खंती
फार तूझी ॥५॥
|