जाई परतोनी, बाळा, जाई परतोनी ।
निष्ठुर मी तुज टाकुनि जातें, येशि कशाला माझ्या मागोनी ॥

जन्मतांच तव जननी गेली सोडुनि तुज या तपोवनीं ।
मींच पाळिलें लाड करोनी, काहिं न अडलें की तुझें ।
गेले जरी, काय उणे तुज, सांभाळितील बाबा तुजलागुनी ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - बालगंधर्व
नाटक - संगीत शाकुंतल (१८८०)
राग - आसावरी (मूळ संहिता)
ताल - त्रिताल
चाल - ’गंगेत लोटा हा’
For the printable version of this song, click here.