पतित तू पावना ।
म्हणविसी नारायणा ॥१॥

तरी सांभाळी वचन ।
ब्रीद वागविशी जाण ॥२॥

याति शुद्ध नाही भाव ।
दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥

मुखी नाम नाही ।
कान्होपात्रा शरण पायी ॥४॥
 
 
गीत - नारायण विनायक कुळकर्णी
संगीत - मा. कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर - बालगंधर्व
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१)
राग - झिंझोटी (मूळ संहिता)
ताल - केरवा
For the printable version of this song, click here.