पाठ शिवा हो, पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा, खेळ वाटतो हवा हवा

बन केळीचे हरित सावळे, लपायास मज असे मोकळे
प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा ?

नुपुर विरहित जरि तव पाऊल, अचुक मला पण लागे चाहुल
कानांनाही फुटते दृष्टी, तुझ्या ऐकता पायरवा

उमटु न देइन साद पाउली, सटकन जाइन जशी सावली
सामावुन मज घेइल अलगद, हा रंभांचा उभा थवा

सावली होशिल, परि कशाची ?
तुझ्या रूपाची, तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे ? दोन जिवांचा जडे दुवा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - वरदक्षिणा (१९६२ )
For the printable version of this song, click here.