गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मीलन

सहज एकदा जाता जाता मिळुनि हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून

विरह संपता, मिलनाची अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफू न सखया तुलाच वाहीन
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - आशा भोसले, सुरेश वाडकर
चित्रपट - भालू (१९८०)
For the printable version of this song, click here.